ads

Ladki bahin yojana हमीपत्र Pdf download 2024

Ladki bahin yojana हमीपत्र Pdf download

हमीपत्र नमुना मराठी pdf:-नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत एक जुलैपासून 2024 पासून याची अर्ज सुरू झालेला आहे. 
Ladki bahin yojana हमीपत्र Pdf download
Ladki bahin yojana हमीपत्र Pdf download


त्याची नोंदणी ठिकठिकाणी सुरू आहे विविध सेतू कार्यालयातून किंवा अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून अर्ज सादर केले जात आहेत. महिला ऑनलाईन स्वरूपात हे अर्ज भरत आहेत.

पण अनेकांनी अजूनही अर्ज केले नाहीत काही नाही योजनेचा अर्ज माहिती नाही. आणि आम्ही पत्र माहिती नाही.तरआपण या आजच्या लेखात तुम्हाला हमीपत्र डायरेक्ट डाऊनलोड करू शकणार आहे. 

अशी त्याची लिंक खाली दिलेली आहे.त्यावर डायरेक्ट जाऊन तुम्ही ही लिंक डाऊनलोड करू शकता.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना हमीपत्र, साठी हे सर्व भरावे लागणार:-

तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुक किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र,हमी पत्र आणि अर्जदाराचा लाईव्ह फोटो ह्या गोष्टी सर्व भरावे लागणार आहेत.

किंवा जर ऑफलाईन अर्ज भरला तर तो अर्ज जवळच्या अंगणवाडी केंद्रावर जमा करायचा आहे.  तसेच तुम्हाला शेतू कार्यालयातही तो जमा करता येईल. 

आणि यासाठी उत्पन्न दाखला काढण्याची गरजही नाही तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही डायरेक्ट यासाठी अर्ज करू शकता.

 Ladki bahin yojana हमीपत्र Pdf download किंवा लाडकी बहीण योजना हमीपत्र:-इथे पहा 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना हमीपत्र व ऑफलाईन अर्ज लिंक :- इथे पहा 

👧 माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे प्रश्न - त्यांची 40 उत्तरे खाली देत आहे कृपया नीट वाचून घ्यावी


१) फॉर्म भरताना डॉक्युमेंट साईज 5MB  पेक्षा कमी असावी.

२) नारीशक्ती ॲप चालत नसेल तर सकाळी लवकर उठून फॉर्म भरा लगेच सबमिट होतो, लाखो जन फॉर्म भरत आहेत त्यामुळे असा प्रॉब्लेम होणार

३) काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही 

४) फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहेत ते आता इथून पुढे अपलोड करा 

५) रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिलं पेज आणि शेवटचे पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा 
६) अर्जदाराचा पत्ता म्हणजे आत्ता जिथे महिला राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकावा.  

७) आता फक्त तुम्हाला आधार कार्ड वरील पत्ता पूर्ण टाकायचा आहे ॲप अपडेट करा

८) पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखलाच अपलोड करावा लागेल 

९) ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेही जमा करायचा गरज नाही.

१०) जॉईंट खाते चालत नाही सिंगल खाते अपलोड करा

११) पोस्टाचे अकाउंट लोड करत असाल तर फक्त ippb चे अकाउंट चालते

१२) अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया आली तर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येईल 

१३) शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो फक्त पंधरा वर्ष चा अगोदर असावा 

१४) रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्ड वर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे, आणि रेशन कार्ड 15 वर्ष पूर्वीचे जुने असावे

१५) बँक अकाउंट कोणतेही टाका काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत म्हणजेच तुमचे आधार कार्ड च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे आधार कार्ड ला बँक लिंक असणे गरजेचे आहे 

१६) सर्व कागदपत्रांवरती नाव, जन्मतारीख सारखी असावी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही 

१७) आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड  डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईड अपलोड करा 

१८) सगळ्या फॉर्म इंग्लिश मध्ये भरावा.

१९) फॉर्म भरायची ऑनलाईन कुठलीही वेबसाईट नाही फक्त नारीशक्ती दूत ॲप मधूनच फॉर्म भरू शकता 

२०) ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरावा 
२१) डोमासाईल नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे- रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता नाहीतर नाही 

२२) फॉर्म भरल्यावर कोणतीही पावती नाही.  येत  तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून तुम्ही तुमचे स्टेटस पहा. 

२३) फक्त अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरण्यासाठी सरकार 50 रुपये देणार आहे, याचा जीआर मध्ये उल्लेख आहे 

२४) फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिला असेल तर आता फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतर त्यामध्ये बदल करता येईल आता काही करू शकत नाही 

२५) पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा तहसीलदाराचा दाखवा असावा

२६) बँक पासबुक अपलोड केले नाही तरी चालेल कारण पैसे आधार डीबीटीने येणार आहेत त्यामुळे ॲप वरती upload करणे मेंदेटरी नाही

२७) महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल तर तुम्ही दुसरे राज्य आता जन्म ठिकाण म्हणून सिलेक्ट करू शकता त्यासाठी ॲप अपडेट करा

२८) फोटो काढल्यावर उजव्या साईडला लाल फुली येत आहे, तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठी आहे, त्यावर क्लिक करून  पुन्हा नवीन फोटो काढू शकता

२९) उत्पन्नाचा दाखला अपलोड करनार असेल तर 2024 25 असावा

३०) आता नवीन जन्म दाखला काढला असेल तर तुम्हाला अपलोड करता येणार.

३१) डॉक्युमेंट्स ओरिजनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेरॉक्स चा फोटो अपलोड केला तरी चालेल 

३२) 5 नंबर आणि 6 नंबरचे कागदपत्रे अपलोड करायला अनिवार्य नाही ( पासबुक आणि पतीचे कागदपत्रे) 

३३) संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा पीएम किसान योजनेची पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणतीही योजनेचे पैसे मिळत असेल, हे पैसे 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त असेल तर फॉर्म भरता येणार नाही

३४) हमीपत्र प्रिंट काढून घ्या त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा सर्व बॉक्स वर खुणा करा आणि आपले नाव टाकून सही करा दिनांक व ठिकाण टाका 

३५) एका कुटुंबात फक्त दोनच महिलांना लाभ घेता येणार एक विवाहित एक अविवाहित.

३६) कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल किंवा कुटुंबात फोर व्हीलर गाडी असेल तर फॉर्म भरू शकत नाही 

३७) लाईव्ह फोटो अपलोड करा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू नका 

३८) आता तुम्ही 65 वयापर्यंत असलेल्या महिलांचे फॉर्म भरू शकता 

३९) नवीन लग्न झालेल्या महिलेकडे काहीच कागदपत्र नसतील तर, पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून डोमासाईल काढावे किंवा जन्म दाखला द्यावा याला काही ऑप्शन नाही 

४०) रेशन कार्ड ऑनलाइन ची प्रिंट निघते ती अपलोड करू नका फिजिकली रेशन कार्ड चा फोटो काढून अपलोड करा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads