ads

Ladaka Bhau Yojana Maharashtra in marathi | लाडका भाऊ योजना शासन निर्णय जाहीर

Ladaka Bhau Yojana Maharashtra in marathi | लाडका भाऊ योजना शासन निर्णय जाहीर

Ladaka Bhau Yojana Maharashtra in marathi
Ladaka Bhau Yojana Maharashtra in marathi


Ladaka Bhau Yojana 2024:- नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखातून लाडका भाऊ योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.नुकताच याविषयी शासन निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे.या योजनेअंतर्गत अप्रेंटिस विद्यार्थ्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये भेटणार आहेत. हा शासन निर्णय काय आहे त्याची सविस्तर माहिती या लेखातून पाहणार आहोत.

Ladaka Bhau Yojana in marathi:-

आपल्या राज्यामध्ये युवक वर्ग खूप मोठा आहे.ते संपूर्ण शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने बाहेर पडतात नोकरी व्यवसाय करण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यामुळे अनेक युवकांना नोकरी किंवा व्यवसाय करणारी संधी मिळत नाही किंवा त्यांना अनुभव नसल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही. अशा अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. यामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण होत आहे ही बेरोजगारीची समस्या नियंत्रित करण्यासाठी अप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना व विद्यावेतन देण्यात येणार आहे.

यामध्ये विशेषतः बारावी पास तसेच विविध ट्रेड मधील आयटीआय पदवीधारक पदवी पदवीत्तर इत्यादी युवकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

उद्योग व बेरोजगार युवकांना जे अडचणींना सामोरे जावे लागते ही अडचणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येतो.त्यालाच पुढे करून ही योजना राबविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024:- 

आपल्या राज्यातील मुलांना त्यांच्या शिक्षण तर प्रत्यक्ष कामाचे योग्य प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळायची "मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना " 2024-25 पासून सुरू करण्याची मान्यता दिलेली आहे.

लाडका भाऊ योजनेचे स्वरूप:-

महाराष्ट्र शासनाचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन नेते विभागाने मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत ही नवीन योजना मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. त्यालाच थोडक्यात लाडके भाऊ योजना नाव दिलेले आहे. या योजनेअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार तसेच इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. तसेच या वेबसाईट अंतर्गत उद्योजक जोडले जाणार आहेत.

रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षण मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांच्या त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण घेऊ शकणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळ सुलभपणे नोंदणी करता येणार आहे.


लाडका भाऊ योजनेची  पात्रता:-

लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

१. उमेदवाराचे वय 18 ते जास्तीत जास्त 35 वर्ष असावे.

२. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे याचा असावी:-

(1) बारावी पास 2) आयटीआय 3) पदवी 4)पदव्युत्तर पदवी

5)सध्या शिक्षण  चालू  असेल तर लाभ मिळणार नाही 

३.महाराष्ट्र राज्यचा रहिवासी असावा.

४.आधारसलग्न बँक पासबुक.

५.आधार नोंदणी झालेली असावी.

६.उमेदवार यांनी कौशल्य,रोजगार व उद्दोजकता आयुक्तलयाच्या वेबसाईटवर नोंदणी करून त्याजवळ रोजगार नोंदणी क्रमांक असावा.

लाभ:-

Ladaka Bhau Yojana Maharashtra in marathi


शासन निर्णय:-इथे पहा.

अधिक माहिती:- इथे पहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads