बांबू शेती करा आणि मिळवा सरकारकडून सात लाख रुपये; जाणून घेऊ या ही सविस्तर योजना.
नमस्कार मित्रांनो आपला भारत देश आहे ते प्रधान देश आहे देशाचे एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 75 टक्के आपल्या शेतीवर अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून विविध योजना राबवत असते. अशाच एका नवीन योजनेविषयी आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत. अटल बांबू समृद्धी योजना ही योजना महसूल विभागाच्या रोजगार हमी योजना विभागाद्वारे राबवली जात आहे.
Bambu sheti yojana |
बांबू लागवड अनुदान योजना योजनेविषयी थोडक्यात:-
१. शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
२. कट्टर बांबू या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन वर्षापर्यंत सहा लाख नव्वद हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
३. हे अनुदान रोप आणि मजुरी स्वरूपातील देण्यात येणार आहे.
४. सध्या पावसाळी वातावरण हवामान चालू आहे त्यामुळे बांबू लागवडीसाठी एकदम अनुकूल अशी परिस्थिती आहे.
अटल बांबू समृद्धी योजना अर्ज प्रक्रिया:-
1.पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेकडे हा अर्ज करणे आवश्यक आहे.
2. सदर अर्ज केल्यावर रोजगार हमी योजनेकडून अंतिम निवड केली जाणार आहे.
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:-
1. आधार कार्ड
2.सातबारा उतारा
3.आठ अ उतारा
4.बँकेची पासबुक.
कोण अर्ज करू शकते:-
१. वैयक्तिक शेतकरी
२. शेतकरी उत्पादक कंपन्या
३.संस्था समूह
४.शासकीय जमिनीवरही बांबू लागवड करता येते.
आजच्या लेखात इतकेच हा लेख कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.
0 टिप्पण्या