मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४ मराठी Mazi Ladki Bahin Yojana 2024 in Marathi
नमस्कार मित्रांनो आजच्या आपण या लेखांमध्ये लेक लाडकी योजने सारखीच एक मुख्यमंत्री माझी बहीण योजना Mazi Bahin Yojana 2024 in Marathi महाराष्ट्र शासन लवकरच सुरू करणार आहे. त्या संदर्भात आजच्या अर्थसंकल्प मध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केलेली आहे .आपण ही माहिती या लेखातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 in Marathi |
Mukhyamantri mazi ladki bahin Yojana Marathi:-
आज राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला.
या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना याची घोषणा केली ही योजना काय असेल या योजनेत किती अनुदान भेटेल याची सविस्तर माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.
तर लेक लाडकी माझी योजना ही महाराष्ट्र शासनाद्वारे राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला अनुदान भेटणार आहे.
Mazi ladki bahin Yojana:- आज अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केलेले आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील सर्व महिलांना पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत.
सर्व महिलांना केंद्रस्थानी ठेवून वाटचाल केलेले आहे असे त्यांनी सांगितले. महिलांना रोजगार ,पोषण आहार,कौशल्य इत्यादी आणि तसेच त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केलेले आहे.
लाभ कुणाला मिळेल?:-
१. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत.
२. वय वर्ष 21 ते 60 या वयोगटातील विवाहित ,विधवा, आर्थिक दुर्बल ,निराधार ,घटस्फोटीत इत्यादी महिलांना लाभ मिळेल.
३. ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आतील आहे अशा महिलांच्या खात्यावर दरमहा पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत.
योजना कधीपासून सुरू:-
राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केलेली लाडकी बहीण योजना ही येत्या जुलै २०२४ पासून सुरू केली जाणार आहे. आणि महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये दरमहा जमा केले जाणार आहेत.
0 टिप्पण्या