ads

काल पासून न्यूव मतदार नोंदणीला सुरुवात, महिनाभर नाव नोंदणी, पत्ता बदलता येणार

काल पासून न्यूव  मतदार नोंदणीला सुरुवात, महिनाभर नाव नोंदणी, पत्ता बदलता येणार

Voter ID apply
Voter ID apply


नमस्कार मित्रांनो लवकरच विधानसभा निवडणूक लागणार आहे. त्यादृटीने आत्ता निवडणूक आयोग कामाला  लागले आहे.  त्यातच लोकसभा निवडणुकीतील मतदारयादीसह मतदान केंद्रातील घोळ समोर आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आता महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान नोंदणीवर लक्ष केंद्रित केले आहे. काल पासून म्हणजेच , मंगळवारपासून (२५ जून) राज्यात सर्वत्र मतदान नोंदणी, पत्ते बदलणे, नाव वगळण्याठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. महिनाभर ही मोहीम सुरू राहणार आहे. त्यानंतर २० ऑगस्टला यांची अंतिम  मतदारयादी जाहीर केली जाणार  आहे.

'२५ जून पासून वेगळंवेगळ्या जिल्ह्यामध्ये  राज्यात निवडणूक अधिकारी घरोघरी जाऊन नवीन मतदार, पत्ता बदलणे किंवा मयताचे नाव वगळण्याबाबत सर्वेक्षण करणार आहेत. यासाठी २४ जुलैपर्यंत मतदार नोंदणी करता येईल.

मोहिमेत काय होणार?


■ मतदारयादीमधील चुकांची दुरुस्ती होणार


■ मतदान कार्ड वर जुने फोटो बदलणे, तसेच मतदान कार्ड वरील पत्त्यामध्ये आणि नावांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. 


■ मतदान केंद्रांची सीमा निश्चित करणे


■ नवीन  मतदान केंद्रांची निर्मिती करणे इत्यादी सारख्या प्रक्रिया पूर्ण होणार आहेत. 


■ मतदान  कार्डमधील चुकांची दुरुस्ती होणार


■ नव्या मतदान केंद्रांचा शोध घेण्यात येणार आहे. 


असा असेल कार्यक्रम ?


■ २५ जून  ते २४ जुलैपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार आहे. 


■ २५ जुलैला प्रारुप मतदारयादी


■ दावे, हरकती करण्याची नऊ ऑगस्टपर्यंत मुदत


■ १९ ऑगस्ट च्या तारखेपर्यंत  सुनावणी होऊन हरकती दूर करणार


■ २० ऑगस्टला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार

हे पण वाचा :-आता नवीन मतदान कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईल मधून

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads