PM JANMAN YOJANA 2024-25| प्रधानमंत्री जनमण योजना मराठी माहिती
Pm janman yojana। in marathi:- आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे आदिवासी जमातीचे घरे आहेत. त्यांच्या स्वतःचे चालीरीती आणि वेगळा इतिहास आहे. इतर समाजापेक्षा ते अधिक अडचणींना सामोरे जात आहेत. देशातील आदिवासी लोकांमध्ये विशेषतः त्यातील आदिम जमातींना (PVTGs)आदिम जमातींना (PVTGs) आदिवासी यांना सर्वात वंचित मानले जाते. पायाभूत सुविधा आरोग्य सेवा आणि इतर गरजांसाठी याच्यात खूप तफावत आढळते. हीच तफावत किंवा असमानता पाहून केंद्र सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये पंतप्रधान जनमन योजना( प्रधानमंत्री जन जाती आदिवासी न्याय महाभियान) सुरू केले आहे.
Pm Janman Yojana in marathi |
या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती लेखांमधून पाहणार आहोत.
Pm Janman Yojana in marathi :-काय आहे जन मन योजना?
पीएम जर्मन योजना ज्याला प्रधानमंत्री जनजाती आदिवासी नई महाअभियान पंतप्रधान आदिवासीने अभियान म्हणून ओळखले जाते हा उपक्रम केंद्र सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू केलेला आहे हे विशेषता आदिम जमातींसाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना विविध योजना मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत भर घालणे आणि त्यांचा विकास करणे हा उद्देश या योजनेचा आहे.
योजनेची गरज काय?
आदिवासी कल्याणचे उद्देशाने विविध उपक्रम राबवूनही,या आदिम जमातींना विविध आव्हानांना सामना करावा लागत आहे .त्यासाठी ही योजना एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या योजनेमध्ये विविध कार्यक्रम राबवून त्यांचे ते अंतर आणि त्यांची परिस्थिती बदलवणे. तसेच सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना शिक्षण आरोग्य सेवा आणि उपजीविकेच्या संधी तसेच पायाभूत सुविधा मिळवून देण्यात येणार आहे तसेच त्यांचे योग्य सक्षमीकरण करण्यात येणार आहे. या सगळ्या गोष्टींची गरज लक्षात घेऊन ही योजना राबवण्यात येत आहे.
उद्दिष्टे:-
प्रधानमंत्री जन्म योजनेचे मुख्य उद्दिष्ट खालील प्रमाणे आहेत.
1. उत्तम मूलभूत सुविधा:-
● आदिम जमातींना सुरक्षित घरे आणि आरोग्य सुविधा पुरवणे
● शुद्ध पेयजल पुरवणे
● डिजिटल आणि भौतिक क्षेत्रातील अंतर कमी करण्यासाठी दूर संसार तसेच रस्ते वाढवणे.
2. सुधारित आरोग्य सेवा आणि शिक्षण:-
● आदिम जमातीच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल याची खात्री आणि कौशल्य आणि साक्षरतेच्या विकासात प्रोत्साहन देणे.
● विशेषता माता आणि मुलांसाठी आरोग्यसेवा साठी सुविधा पुरविणे. तसेच नवजात बालकांचा मृत्यू दर कमी करणे.
3. शाश्वत उपजीविकेच्या संधी:-
● आदिम जमातींना त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी पारंपारिक कलाकुसरींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि उद्योजक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असलेली त्यांना विविध साधने प्रदान करणे.
● अशाप्रकारे त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.
4 सुरक्षित पोषण आहार:-
● आदिवासी समुदायामध्ये एक गंभीर समस्या असलेल्या कुपोषणाचा सामना करण्यासाठी त्यांना सुरक्षित पौष्टिक अन्न उपलब्ध आहे का नाही याची खात्री करणे तसेच आहारातील विविधतेला प्रोत्साहन देणे.
5. परंपरा चे संरक्षण:-
● आदिम जमातींची विविध परंपरा रीती रिवाज आणि त्यांचे सांस्कृतिक इतिहास यांचा जतन करणे आणि प्रगत करणे.
फायदे:-
प्रधानमंत्री जन मन योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत. सुरक्षित घरे, स्वच्छता आणि स्वच्छ पाणी, दळणवळणाच्या सोयी सुविधा, शैक्षणिक टक्का वाढवणे, चांगले आरोग्य, नवजात बालकांचा मृत्यू दर कमी करणे, कौशल्य विकास. पारंपारिक कला रितीरिवाज यांचा प्रचार, रोजगार निर्माण करणे आणि योग्य पोषण आहार
सुविधा:-
घर स्वच्छ पिण्याचे पाणी स्वच्छता विज रस्ता आणि दूरसंचार कनेक्टिव्हिटी शाळा कौशल्य विकास आरोग्यसेवा पायाभूत सुविधा सुधारित आरोग्य सेवा कौशल्य प्रशिक्षण रोजगार पारंपारिक हस्तकलेचा प्रसार स्वच्छ पोषण जागरूकता आणि संस्कृती ओळख प्रोत्साहन,
तर मित्रांनो तुम्हाला पण पीएम जनमण योजना कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लेखात तुम्हाला काही सूचना असेल तर आम्हाला कमेंट करून सांगू शकता.
0 टिप्पण्या