ads

शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र:Farmer Government Scheme Maharashtra

शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र:-Farmer Government Scheme Maharashtra

शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र
शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र
नमस्कार मित्रांनो, आजच्या  या लेखात आपण  राज्य सरकार च्या खास शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांबद्दल माहिती पाहणार  आहोत.

भारतातील साठ टक्के लोकसंख्या हि शेतीवर अवलम्बुन आहे. त्यामुळे सरकार विविध योजना ह्या शेतकऱ्यांसाठी राबवत असते. अश्याच विविध योजना आपण या लेखातून पाहणार आहोत. 

१) पोखरा योजना माहिती :-

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ही पोखरा योजना येत आहे. ही पोखरा योजना शेतकऱ्यांसाठी सरकारने बनवलेले आहे. या पोखरा योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांसाठी उत्तम अतिशय उत्तम अशी योजना आहे.

या योजनेविषयी सविस्तर माहिती वाचा :- इथे पहा 

२) लेक लाडकी योजना:- 


1. पिवळ्या किंवा केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये.

2. मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये.

3. मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये.

4. आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये.

5. असे सर्व मिळून एकूण एक लाख 1000 रुपये एवढी रक्कम देण्यात येईल.


या योजनेविषयी सविस्तर माहिती वाचा :- इथे पहा 

३) नमो शेतकरी महा सन्मान निधी :-

शेतकऱ्यांना योग्य उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये केंद्र सरकार तर्फे थेट जमा केले जातात.

त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासंघ ही योजना सुरू केली आहे. याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली असली तरी या योजनेचा शुभारंभ माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे 26 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आला आहे.

या योजनेविषयी सविस्तर माहिती वाचा :- इथे पहा 

४) अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना:-

"अण्णासाहेब पाटील खरेदी ट्रॅक्टर योजना" ही योजना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आय आर वन अंतर्गत राबवली जाणार आहे. महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सवलत देण्याचा निर्णय आण्णासाहेब पाटील महामंडळ मार्फत घेण्यात आला आहे. गेले काही दिवस खरेदी या ट्रॅक्टर खरेदी योजनेला मंडळामार्फत स्थगिती देण्यात आले होते.परंतु आता या योजनेची मंडळामार्फत पुन्हा सुरुवात करण्यात आलेले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अण्णासाहेब महामंडळामार्फत करण्यात आलेले आहे.

या योजनेविषयी सविस्तर माहिती वाचा :- इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads