ads

Shaley poshan Aahar yojana:शालेय पोषण आहार नवीन बातमी|विद्यार्थ्यांना आत्ता अंडे ,फळे आणि बिर्याणी.

Shaley poshan Aahar yojana:शालेय पोषण आहार नवीन बातमी|विद्यार्थ्यांना आत्ता अंडे ,फळे आणि बिर्याणी.

नमस्कार मित्रांनो शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी विद्यार्थ्यांना आता शालेय आहारात देण्यात अंडे,केळी,बिर्याणी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण योजनेच्या " Shaley poshan Ahar yojana " आहारात आता आठवड्यातून एकदा अंड्यांच्या समावेश करण्यात येणार आहे जे विद्यार्थ्यांनी खात नाहीत त्यांच्यासाठी स्थानिक फळांचा समावेश करण्यात आलेला आहे असा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे.

Shaley poshan aahar yojana
Shaley poshan Aahar yojana

Shaley poshan aahar yojana 2023:- 

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात आता आठवड्यात एकदा अंडी आणि स्थानिक फळांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाचे शिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे. राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदान शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आहार आणि पोष्टिक आहार देण्याच्या निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे.

राज्याच्या शिक्षण विभाग कडून राबविण्यात येणारे पोषण आहार योजनेनुसार विद्यार्थ्यांना नियमित आहारा व्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी  आहेत तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना स्थानिक फळे दिले जाणार आहेत या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे किंवा अंडी पुलाव किंवा बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्यात येणार आहे.

अंडी न खाणाऱ्यांसाठी केळी किंवा स्थानिक फळ:- shaley Poshan aahar Yojana:-

तर विद्यार्थ्यांसाठी जे अंडे खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंडे ऐवजी स्थानिक फळ किंवा केळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा सरकारचा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने 23 आठवड्यांकरता सुरू केला आहे. आत्ता सध्या अंड्यांचा बाजार भाव विचारात घेत आहे पाच रुपये दर निश्चित करण्यात आलेला आहे.

केंद्र सरकारची प्रधानमंत्री पोषण शिक्षण शक्ति निर्माण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारचा लाभ देण्यात येत असतो या उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहारा व्यतिरिक्त अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने अंड्यांमधील पौष्टिक मूल्याचा भाव लाभ विद्यार्थ्यांना मिळवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शासन निर्णयाद्वारे म्हटले आहे.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे तंदुरुस्त राहावे यासाठी राज्याचे आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी शालेय पोषण आहार योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बालकांना मोफत आहार दिला जातो. शालेय पोषण आहार ही योजना सुरू करणे मागे शाळांमध्ये मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असणे आणि त्यांना चांगले शिक्षण आणि पोषण विकसित करणे हा राज्य सरकारचा उद्देश आहे. पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमध्ये प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या मुलांना राज्य सरकारकडून हा पोषण आहार दिला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads