ads

Namo shetkari yojna status असे चेक करा नमो शेतकरी योजनेचे स्टेटस पहिला हप्ता आला की नाही असे करा माहीत.

Namo shetkari yojna status असे चेक करा नमो शेतकरी योजनेचे स्टेटस पहिला हप्ता आला की नाही असे करा माहीत.

Namo shetkari yojna status:- तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा नुकताच पहिला हप्ता दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी शेतकऱ्यांना वितरित केला आहे परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना अजूनही हा पहिला हप्ता भेटलेला नाही तर त्यांनी आपले नमो शेतकरी योजनेचे स्टेटस कसे पाहायचे किंवा कसे चेक करायचे याबाबत त्यात त्याची वेबसाईट कोणती आहे याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या लेखातून पाहणार आहोत.

Namo shetkari yojna status
Namo shetkari yojna status

Namo shetkari yojana beneficiary status check online,namo shetkari status check online,Namo shetkari portal,namo shetkari yojana list 2023 maharashtra,namo shetkari beneficiary status,namo shetkari yojana beneficiary list,namo shetkari yojana beneficiary list pdf,namo kisan beneficiary status

नमो शेतकरी योजना स्टेटस:-namo shetkari status check online

शेतकऱ्यांना योग्य उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये केंद्र सरकार तर्फे थेट जमा केले जातात.


त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासंघ ही योजना सुरू केली आहे. याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली असली तरी या योजनेचा शुभारंभ माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे 26 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आला आहे.


राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये शेतकरी सन्माननिधी म्हणून मिळतील.


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधीतरी झाल्यानंतर या योजनेचे स्टेटस कसे पाहायचे हा प्रश्न तुमच्या आमच्या शेतकऱ्यांना पडला होता.


परंतु अखेर नमो शेतकरी योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे या पोर्टलवर नमो शेतकरी योजनेचे स्टेटस कसे पाहायचे हे आपण थोडक्यात पाहणार आहोत.


असे करा चेक नमो शेतकरी योजना स्टेटस:-Namo shetkari yojana beneficiary status check online

शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी आता हे नवीन पोर्टल सुरू केले आहे तुमचे स्टेटस पाहण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा.

1.सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये कोणतेही ब्राउझर ओपन करा.

2.त्यानंतर सर्च करा https://nsmny.mahait.org/ ही लिंक ओपन करा.

3.हे पोर्टल ओपन झाल्यावर तुम्हाला 2 पर्याय दिसतील एक लॉगिन आणि दुसरा बेनफेसरी स्टेटस.

4.पुढे आपल्याला beneficiary status या वर क्लिक करा.

5.हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा प्रधानमंत्री किसान योजनेचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधारकार्ड किंवा आधारकार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर असावा, हे नसेल तर तुमचा प्रधानमंत्री किसान योजनेच रजिस्ट्रेशन नंबर माहिती असणे आवश्यक आहे.

6.हे स्टेटस चेक करण्यासाठी वरील मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर  टाकून get data या पर्याय वर क्लिक करावे.

7.get data या वर क्लिक केल्यावर तुम्हाला या नमो शेतकरी योजनेच स्टेटस पाहता येईल.


योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 

प्रधानमंत्रि योजनेचे रजिस्ट्रेशन नंबर पाहण्यासाठी इथे क्लीक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads