ads

प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना pramod mahajan kaushalya vikas yojana Marathi

प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना pramod mahajan kaushalya vikas yojana Marathi

राज्यातील तरुणांना विशेष म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी  महाराष्ट्र राज्य सरकारने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच विषय आपण आजच्या लेखातून pramod mahajan kaushalya vikas yojana सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

pramod mahajan kaushalya vikas yojana Marathi
pramod mahajan kaushalya vikas yojana Marathi



प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना मराठी:-

आपल्या देशात अनेक कुशल कारागीर आहेत की जे अत्यंत कमी दरात दर्जेदार उत्पन्न तयार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे अशाच देशाची वाढती बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे त्यामुळे भारतीय कामगारांसाठी जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

या अनेक संधीचे माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेत शाश्वत वृर्दी व विकास होण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल असा मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक आहे.

याच पार्श्वभूमीवर दोघ व इतर क्षेत्रात या संधीचा फायदा घेण्यासाठी आपल्या देशातील तरुणांना या सध्याच्या युगात असलेल्या विविध उद्योग क्षेत्रामधील बदल आधुनिक तंत्रज्ञान रूप कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेले आहे.

या केंद्र सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या वरील संकल्पच्या आधारे महाराष्ट्र राज्य सरकारने कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र हे विजन ठेवून पुढील कार्य सुरुवात केलेले आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातली योग युवतींचे कौशल्य विकासद्वारे सक्षमीकरण करून त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग सेवा तसेच विविध क्षेत्रात रोजगार सोयी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अभियान याची सुरुवात करण्यात आली आहे.

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाचा मुख्य उद्देश:-


1. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कौशल्य योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली करणे.
2. राज्यात 15 ते 45 वर्षे वयोगटातील कार्यक्षम उमेदवारांना कौशल्य प्रदान करून त्यांना रोजगार सक्षम बनवणे होय.
3. प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या पैकी किमान 75 टक्के उमेदवारांना प्रत्यक्ष नोकरी किंवा स्वयंरोजगार मिळवून देणे.
4. राज्यातील उद्योगांना कुशल म्र मनुष्यबळ पुरवणे जेणेकरून त्यांची उत्पादकता वाढेल.
5. राज्यात नवनवीन निर्माण होणारी रोजगाराची क्षेत्रे शोधून त्या अनुषंगाने विषम मनुष्यबळाची निर्मिती करणे.
6. कृषी पूरक व्यवसाय तसेच पारंपारिक व्यवसायिक कौशल्य या क्षेत्रातील प्रशिक्षण यांच्यावर प्रशिक्षण देण्यावर भर राहील.


pramod mahajan kaushalya vikas yojana:-प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र:-


महाराष्ट्र राज्यातील आपल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्रामीण भागाचे विकासाला चालना देण्यासाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना तयार करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कौशल्य विकास हा विषय नेहमीच आत्मयतेचा राहिलेला आहे म्हणूनच राज्य सरकारने यास धरतीवर याच संकल्पनेवर आधारित 511 ग्रामपंचायत मध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याच्या निर्णय घेतलेला आहे.

हे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश हा रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
तरुणांना जर त्यांच्या गावाजवळ रोजगार मिळाला तर शहराकडे होणारे मोठे स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी करता येता करता येईल.

हे सर्व साध्य करण्यासाठी कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना महत्त्वाची ठरू शकते.
याच अनुषंगाने मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्रात 511 प्रमोद महाजन ग्रामीण विकास केंद्रांचा शुभारंभ केला आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते तसेच उद्घाटन प्रसंगी दिलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांन सांगितले की आज देशभरात व जगभरात भारतातील कुशल धरणांची मागणी मोठी वाढत आहे जगात अशी अनेक देश आहेत जिथे तरुणांपेक्षा वर्गांची संख्या जास्त आहे आणि काम करण्याची प्रशिक्षित तरुण मिळणे खूप कठीण आहे

पुढे एका सर्वेक्षणाचा दाखला देत म्हणाले की जगातील 16 देश सुमारे 40 लाख कुशल तरुणांना नोकरी देऊ इच्छित आहे.

म्हणूनच या नवीन निर्माण होणाऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी आज आपण केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर जगासाठी पण कुशल  कामगार तयार करत आहोत.

प्रधानमंत्री म्हणाले की आज राज महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांची नवीन कौशल विकास केंद्र उघडले जात आहेत. त्यातून संपूर्ण जगासाठी संधी निर्माण होणार आहे.

भविष्यात राज्यातल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे जेणेकरून अधिकाधिक कुशल कामगार आपल्या राज्यात तयार होतील.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केंद्रांची अंमलबजावणी:-

बाजारपेठेतील विविध प्रकारच्या रोजगाराच्या मागणी लक्षात घेऊन बाजारपेठेत आवश्यक असलेले कौशल्य निर्माण करून रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील 350 तालुक्यातील 511 ग्रामपंचायत मध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 19 सप्टेंबर 2023 रोजी 511 प्रमोद महाजन ग्रामीण विकास केंद्रांचा शुभारंभ केला आहे. 

भविष्यात या कौशल्य केंद्राची संख्या वाढवण्याच्या सरकारचा प्रयत्न आहे.  तसेच प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम राज्यस्तरावर होणार आहे.

त्यामुळे महाराष्ट्र शास महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास उद्योग यांच्याबरोबरच महसूल ग्रामविकास यांच्या सहमहिला व बालविकास विभागांचा यामध्ये सहभाग असणार आहे.

या कौशल्य विकास कार्यक्रमांना राज्यातील लोकप्रतिनिधी बरोबर आशा व अंगणवाडी सेविका यांचाही समावेश केला जाणार आहे.  जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अभियान पोहोचवता येईल. 

केंद्र सरकारने नुकतीच सुरू केलेले विश्वकर्मा योजनाही या संबंधित असलेल्या लाभार्थी देखील या कार्यक्रमाचा भाग होणार आहेत.


तर मित्रांनो आजच्या लेखात तुम्हाला ही pramod mahajan kaushalya vikas yojana माहिती कशी वाटली.  तसेच जर तुम्हीही ग्रामीण भागात राहत असाल तर या सरकारचे योजना नक्की फायदा करून घ्या.  तसेच त्याचबरोबर  हा लेख तुमच्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा.  जेणेकरून जर कोणाला मिळवायचं असेल तर त्याला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती ते या लेखाद्वारे मिळू शकतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads