ads

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना 2023 | Annasaheb patil tractor yojana in Marathi

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना 2023 | Annasaheb patil tractor yojana in Marathi

अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी योजनेला सुरुवात. खुशखबर! खुशखबर!

नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांना माहित आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या हवामानाप्रमाणे वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन हे शेतकरी घेत असतात. बरीच भारतीय कृषी उत्पादने निर्यातीत निर्यात केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या Annasaheb patil tractor yojana in Marathi  योजनांची अंमलबजावणी करीत असते.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध शेतीच्या योजना राज्य शासनामार्फत राबवल्या जात आहेत. त्यापैकीच ही एक योजना म्हणजेच "अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ट्रॅक्टर खरेदी योजना" होय.

Annasaheb patil tractor yojana in Marathi
Annasaheb patil tractor yojana in Marathi


आजच्या या लेखामध्ये आपण या योजनेबद्दल योजनेविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा आणि मित्रांना पण शेअर करा.

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर खरेदी योजना थोडक्यात:-

योजनेचे नाव:- अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर खरेदी योजना

राबवणारे मंडळ: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

योजनेचा स्तर:-राज्यस्तरीय

योजनेचा लाभार्थी:- महाराष्ट्र तील शेतकरी

अधिकृत वेबसाईट:-इथे पहा 

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर खरेदी योजना 2023 Annasaheb patil tractors yojana 2023:-

"अण्णासाहेब पाटील खरेदी ट्रॅक्टर योजना" ही योजना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आय आर वन अंतर्गत राबवली जाणार आहे. महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सवलत देण्याचा निर्णय आण्णासाहेब पाटील महामंडळ मार्फत घेण्यात आला आहे. गेले काही दिवस खरेदी या ट्रॅक्टर खरेदी योजनेला मंडळामार्फत स्थगिती देण्यात आले होते.परंतु आता या योजनेची मंडळामार्फत पुन्हा सुरुवात करण्यात आलेले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अण्णासाहेब महामंडळामार्फत करण्यात आलेले आहे.

या महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात सत्तर हजार लाभार्थ्यांना 5140 कोटी रुपयांची कर्ज विविध बँकांनी व्यवसाय करता वितरित केले आहे अशी माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.

आज पासून म्हणजे या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदीला सुरुवात होणार आहे. यासाठी महिंद्रा आणि एस्कॉर्ट टर्बो या दोन कंपनीसोबत Mou करार करण्यात येणार आहे अशी माहिती या मंडळामार्फत देण्यात आली आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे:-

1.जातीचा दाखला (cast certificate)

2.पॅन कार्ड (pan card)

3.रेशन कार्ड (ration card)

योजनेसाठी पात्रता आणि अटी:-

1. लाभार्थी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा असावा.

2. लाभार्थ्याचे वय 18 ते 60 वर्षे असावे.

3. व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतल्यास कर्जफेडीचा ईएमआय हा प्रति महिना असणे आवश्यक आहे.

4. या योजनेसाठी व्याज परताव्याच्या लाभासाठी बँक कर्ज मंजुरीच्या दिनांक लाभार्थीने पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक असेल.

5. या लाभार्थ्यांना कर्ज देणारी बँक ही पत हमी अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

6. या योजनेअंतर्गत लाभार्थीने अर्ज दाखल केल्यानंतर पुढील सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपले पात्रता प्रमाणपत्र मंजूर /ना मंजूर असल्याचे लाभार्थीला कळवण्यात येणार आहे.

7. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा पहिला हप्ता मुदल व व्याज अनुदान स्वरूपात लाभार्थ्याचे बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहे.

8. जे महिला बचत गट शेती पूरक व्यवसाय करत असतील अशा सर्व महिला बचत गटांना महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत आय आर दोन अंतर्गत असलेली जास्तीत जास्त वयाची अट ही रद्द करण्यात आलेले आहे.

9. या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण/ तरुणींना दिला जाणार आहे. यासाठी त्यांच्या जात प्रमाणपत्रावर मराठा असा उल्लेख असणे गरजेचे आहे.

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर खरेदी योजनेतील बदल:-

या योजनेचा सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी या योजनेत यावर्षी खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत ते खालील प्रमाणे आहेत.

1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आय आर दोन अंतर्गत कर्ज मर्यादा दहा लाख रुपये वरून पंधरा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आले आहे.

2. व्याज परताव्यासाठी तीन लाख रुपयांच्या मर्यादित येणाऱ्या सर्व व्याज प्रकाराचे मर्यादा आता 4.5 लाखापर्यंत वाढवून देण्यात आले आहे.

3. कर्जाचा कालावधी हा आता पाच वर्षे वरून सात वर्षांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे.

4. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत वयोमर्यादा त वाढ करून साठ वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रॅक्टर खरेदी योजनेची अंमलबजावणी:-

1. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शासन आपल्या दारे या अभियानातून प्रेरणा घेत महामंडळाने देखील महामंडळ आपल्या दारी हे अभियान सुरू केले जात आहे.

2. या अभियानातून आतापर्यंत तीन संवाद मिळे राज्यात आयोजित करण्यात आले व एकूण 11 जिल्ह्यांमध्ये दौरे करण्यात आले.

3. सर्व लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाने बँक ऑफ इंडिया सोबत सामांजसे करार केला आहे.

4. तसेच पुढील काळात महामंडळ राज्यातील सर्व सीएससी सेंटर धारकांसोबत करार करण्याचे विचारधन आहे.

5.भविष्यात अधिकाधिक मराठा समाजाचे उद्योजक तयार करण्याचे महामंडळाचे उद्दिष्ट आहे.

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर खरेदी योजनेचे फायदे:-

1. ट्रॅक्टर खरेदी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

2. ट्रॅक्टर खरेदी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 15 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज महामंडळामार्फत देण्यात येणार आहे.

3. ट्रॅक्टर योजनेमुळे राज्यातील गरीब शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

4. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध होणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची कामे ट्रॅक्टरमुळे जी अडत होती त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

तर मित्रांनो Annasaheb patil tractor yojana in Marathi योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची महत्वाची आहे गरजू व गरीब शेतकरी बांधवांसाठी आर्थिक परिस्थितीमुळे ट्रॅक्टर खरेदी पासून वंचित राहिलेले आहे त्यांना या योजनेचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व जेणेकरून ज्यांना या कर्जाची गरज आहे त्यांना याबद्दल माहिती मिळेल.

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads