ads

महाराष्ट्र पोलीस भरती 2023-24 |Maharashtra police requirements

महाराष्ट्र पोलीस भरती 2023-24 |Maharashtra police requirements 

राज्यात महाराष्ट्र शासनातर्फे लवकरच पोलिसांची विक्रमी भरती होणार आहे तब्बल 18000 पद भरली जाणार आहेत काय आहे नवीन निर्णय जाणून घेऊया,


Maharashtra police bharti
Maharashtra police bharti


महाराष्ट्र पोलीस भरती:- शासनातर्फे महाराष्ट्र राज्यात लवकरच पोलिसांच्या 18 हजार पदांची विक्रमी अशी भरती होणार आहे आतापर्यंत ही सर्वात मोठी भरती आहे अशी माहिती राज्य सरकारकडून दिलेले आहे.

आपल्या राज्यात 1960 नंतर प्रथमच पोलीस दलासाठी नवीन आकृतीबंध तयार करून तब्बल आठरा हजार पदांची भरती सुरू केली आहे.

आतापर्यंतची सर्वात मोठी ही विक्रमी भरती ठरणार आहे . राज्य सरकारकडून यापेक्षाही अधिक पदांची भरती करायची होती पण राज्यात प्रशिक्षण सुविधा पुरुषांना नसल्याने आधी त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. ही सम्पूर्ण माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेले आहे.

कंत्राटी भरती:-

राज्यात पोलिसांची कधीही कंत्राटी भरती केली जाणार नाही याची माहिती त्यांनी दिलेली आहे.
विधानसभेत सत्ताधारी पक्षाने उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चा आणि विरोधी पक्षांनी नियम 293 अंतर्गत केलेल्या चर्चेला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एकत्रित उत्तर दिले यावेळी त्यांनी पोलीस दलात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.

मुंबई आणि पुणे पोलीस दलात दहा हजार पदे रिक्त आहेत त्यांच्या विनंतीनुसार सुरक्षा मंडळातील काही पोलीस त्यांना 11 महिन्यासाठी देत आहोत.

कुठल्याही प्रकारची कंत्राटी भरती केली जाणार नाही.1960 नंतर प्रथमच पोलिसांच्या संख्येची पुनर्रचना केले आहे 19 60 चा आकृतीबंध आतापर्यंत वापरत होतो.

आत्ता प्रत्येक पोलीस ठाण्यात किती अधिकारी कर्मचारी हवेत याची नवीन मानके राज्य शासनाने सरकारने मान्य केले आहेत. 1960 च्या लोकसंख्येनुसार नव्हे तर त्यासाठी सन 2023 आकडेवारी विचारात घेण्यात आलेले आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलेले आहे.


महिला अत्याचाराच्या बाबतीत प्रति लाख लोकसंख्येमागे विचार करायचा झाल्यास महाराष्ट्र देशात 12 व्या क्रमांकावर आहे महिला बेपत्ता होत असल्या तरी त्या परत येण्याचे प्रमाण महाराष्ट्रात 90% पर्यंत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads