ads

(What is budget) बजेट म्हणजे काय ? अर्थसंकल्प म्हणजे काय? समजून घ्या सोप्या भाषेत मराठी मध्ये | What is Budget in Marathi? Bajet Mhanje Kay?

(What is budget) बजेट म्हणजे काय ? अर्थसंकल्प म्हणजे काय? समजून घ्या सोप्या भाषेत  मराठी मध्ये | What is Budget in Marathi? Bajet Mhanje Kay?

https://www.marathionlineupdate.com/
Budget in Marathi


What is Budget 2023-24 in Marathi - बजेट म्हणजे नेमकं काय? देशाचं बजेट कसा बनवला जातो? हे बजेटच  देशासाठी  एवढे महत्त्व काय  आहे? जाणून घेऊया  बजेट संदर्भातलातील  सर्व रोचक गोष्टी ते पण अगदी  सरळ आणि सोप्या आपल्या मराठी भाषेत. तर भाग मित्रानो आपल्या देशाचा अर्थसंकल्प  हा दरवर्षी सादर केला जात असतो. परंतु अनेक  लोकांना माहीत नाही आहे की नेमके अर्थसंकल्प  म्हणजे काय? अर्थसंकल्प दरवर्षी का काढला जातो. बजेट ला अर्थसंकल्प असेही का म्हटले जाते. अर्थसंकल्प विषयी सर्व माहिती खाली देण्यात आली आहे एक नक्की सविस्तर वाचा. 

अर्थसंकल्प म्हणजे काय? What is Budget 2023 in Marathi? 

Arthsankalp Mhanje Kay - अर्थसंकल्प म्हणजे देशाचा संपूर्ण वर्षासाठीचा जमा खर्च होय. किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचं ठरलं , तर अर्थसंकल्प म्हणजे येणाऱ्या  आर्थिक वर्षात देशाकडे एकूण किती पैसा गोळा होणार आहे. याचा अंदाजीत अहवाल . यामध्ये  किती पैसे देशाच्यावेगवेगळ्या  कामासाठी कुठे कुठे किती खर्च होणार आहेत . यांचे अंदाज पत्र म्हणजे अर्थसंकल्प होय. (India Budget 2023)

अर्थसंकल्प व्याख्या :-अर्थसंकल्प म्हणजे काय 2023 याबद्दलच्या अनेक  व्याख्या आहेत त्यातील काही व्याख्या पुढीलप्रमाणे.

"विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या कमाई आणि खर्चाचे अंदाजे विवरण म्हणजे अर्थसंकल्प होय .  शाशन विशिष्ट आर्थिक वर्षातील अंदाजे कमाई आणि खर्चाचा तपशील अर्थसंकल्पाद्वारे सादर करते. यालाच आर्थिक बजेट असे म्हणतात." 


"आयव्ययाचे अंदाजपत्रक. विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प."

अर्थसंकल्प कसा तयार केला जातो ? |Budget of india in Marathi

देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सगळे मंत्रालय मिळून बजेट वर काम करतात. जसे की अनेक मंत्रालय, केंद्रशासित प्रदेश ,राज्य वित्तीय संस्था ,सुरक्षा विभागातील वेगवेगळी खाते, उद्योगपती, वेगवेगळ्या समित्या, शेतकरी संस्था , अशा सगळीकडुन येणारा पैसा व खर्च होणारा म्हणजेच जाणारा पैसा याबद्दलची माहिती गोळा केली जाते. आणि सोबतच अनेक  अर्थतज्ज्ञांचा सुद्धा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सल्ला घेतला जातो . अशा  सर्वांचा विचारविनिमय  करून सर्व बाबी माननीय पंतप्रधानांना सांगितल्या जातात. व  सोबत निधीची तरतूद आणि कर विषयी सर्व  माहिती त्यांना कळवली जाते व शिक्कामोर्तब  झाल्यावर अर्थसंकल्प निश्चित केला जातो.


अर्थसंकल्प कोणत्या मुख्य गोष्टींचा समावेश केला जातो.

अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्प त्याची कमाई आणि खर्च यांची माहिती  . तसेच नागरिकांच्या कल्याणकारी योजनांवरील खर्च. आयातीवरील म्हणजेच इम्पोर्ट  खर्च. सुरक्षा आणि पगारावरील खर्च, कर्जावरील व्याज हे सरकारचे मुख्य  खर्च आहेत.आणि सोबत याच्यात सरकारला मिळणाऱ्या कमाईच्या वाटेमध्ये येणारा कर. सार्वजनिक कंपन्यांची कमाई आणि जारी केलेले बॉण्ड त्यांच्यापासून मिळणारी कमाई यांचा समावेश आर्थिक अर्थसंकल्प मध्ये असतो.

केंद्रीय अर्थसंकल्पचे दोन भाग कोणते?

केंद्रीय अर्थसंकल्प असे दोन भाग पडतात. हे दोन  भाग कोणते आहेत हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

भाग एक :- 

  • महसूली  अर्थसंकल्प 

भाग दोन :-

  •  कॅपिटल अर्थसंकल्प  ( भांडवली अर्थसंकल्प )

१) महसूली अर्थसंकल्प म्हणजे काय? 

महसूली अर्थसंकल्प  म्हणजे सरकारचे उत्पन्न आणि खर्च याची  संपूर्ण माहिती होय .व महसूल प्राप्ती किंवा कमाई आणि सरकारला मिळालेला महसूल खर्च याचे एकत्रीकरण म्हणजे महसूली अर्थसंकल्प होय.

2) कॅपिटल अर्थसंकल्प  ( भांडवली अर्थसंकल्प ) म्हणजे काय?

कॅपिटल अर्थसंकल्प  ( भांडवली अर्थसंकल्प )  म्हणजे देशाचा भांडवली खर्च याच्यात यंत्रसामग्री उपकरणे घर, आरोग्य सुविधा व शिक्षण यावरील सरकारचा केलेला खर्चाचा लेखाजोखा यात  समाविष्ट असतो. यालाच कॅपिटल अर्थसंकल्प  ( भांडवली अर्थसंकल्प ) असे  म्हटले जाते.


केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ माहिती | Union Budget or India 2023 in Marathi

आर्थिक केंद्रीय अर्थसंकल्प २०२३  आपल्या देशाच्या  अर्थमंत्री निर्मला सीतारामन या हा अर्थसंकल्प  सादर करणार आहेत. अर्थसंकल्प केंद्रीय हा दरवर्षी  एक फेब्रु. २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजेला सादर करण्यात येईल. हा बजेट  राष्ट्रातील अंदाजेच खर्चाच्या आणि उत्पन्नाचा  अंदाज आल-गेलं  गृहीत धरून बनवलेला असतो. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३  हा १  एप्रि.  २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षासाठी लागू राहील. 


सरकारला  उत्पन्न कुठून मिळते? | Government Income Scource

अनेकांना प्रश्न पडतो कि , सरकारला येणार  पैसा हा कुठून येत असतो. सरकारला  मिळणारे उत्पन्नाचे स्त्रोत्र नमक  काय आहेत. ती माहिती खालील प्रमाणे आहे. 

1) प्राप्तिकर

2) कॉर्पोरेट कर

3) जीएसटी

4) उत्पादन शुल्क

5) निर्गुंतवणूक

6) रस्ता आणि टोल

7) पासपोर्ट आणि व्हिझा फी

8) रिझर्व्ह बँक फंड

9) सरकारी कंपन्या

10) वीज, फोन, गॅस

12) राज्य सरकारचे हित


Budget या शब्दाचा अर्थ नेमका  काय होतो? | Budget Meaning in Marathi?

Budget म्हणजे अंदाजपत्रक. किंवा अर्थसंकल्प, किंवा प्रमुख जमाखर्चांची यादी म्हणजेच  अर्थसंकल्प किंवा बजेट होय. 



 भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2023 याविषयी प्रश्न :-

१) केंद्रीय अर्थसंकल्प 2023 कोणी सादर करेल ?

उत्तर:- भारताचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून १  फेब्रु. २०२३ रोजी सादर केला जाईल.


२) अर्थसंकल्प २०२३ सादर करण्याची वेळ व  ची तारीख काय आहे?

उत्तर:- देशाचा आर्थिक अर्थसंकल्प हा १ फेब्रु.  २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजतात जाहीर करण्यात येईल.


३) केंद्रीय अर्थसंकल्प 2023 काय आहे?

उत्तर :- केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ म्हणजे, राष्ट्राचा  आर्थिक जमा खर्च जो पुढल्या  आर्थिक वर्षासाठी दिला जात असतो. केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे सरकारकडे जमा होणारा पैसा कोणत्या मार्गाने येईल आणि तो कुठल्याकुठल्या  ठिकाणी खर्च केला जाईल यांचं विश्लेषण अहवाल म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प होय.


आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads