महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी (UPSC)संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा संपूर्ण तयारी करिता दिल्ली येथील नामवंत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देणे योजना:-
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा संपूर्ण तयारी करिता दिल्ली येथील खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण घेणेसाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test- CET) घेण्यात येणार आहे. या करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
UPSC 2022 |
प्रशिक्षणार्थीची सर्व साधारण पात्रता:-
1. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तसेच उपरोक्त परीक्षेची इतर अर्हता, शिक्षण, वय व इतर पात्रता व अटी पूर्ण केलेल्या असाव्यात.
2. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील कमीत कमी ५ वर्षे रहिवासी / अधिवासी असला पाहिजे.
3. उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादी मधील असणे आवश्यक
4. प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा अर्ज करते वेळेस उमेदवाराकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
5. शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास ह्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही.
6. उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण सोडवायचे असल्यास त्या उमेदवारास प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणाकरिता संस्थेने केलेला खर्च पुन्हा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस परत द्यावा लागेल.
7. उमेदवाराने खोटे कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घेतला असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेकडून संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च वसूल करून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
8. उमेदवारास एकाच वर्षी सदर योजनेचा व आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक - प्रशिक्षण - २०२० / प्र.क्र. ७५ / का. -०९ दिनांक १३ नोव्हेंबर, २०२० अन्वये संघ लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा व मुलाखत तयारी साठी देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन आर्थिक मदत योजना या दोन्ही योजनेचा एकत्रित लाभ घेता येणार नाही.
9. प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवाराने धुम्रपान करणे, अंमली पदार्थाचे सेवन करणे, मद्यपान करणे, उद्धट वर्तन असे गैर प्रकार केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येऊन कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
10. PVTG जमातीच्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
11. नियमानुसार मुली व दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवल्या जातील. परंतु आरक्षित जागेवर महिला व दिव्यांग, अनाथ पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर जागा अनुसूचित जमातीतील गुणानुक्रमे पात्र असलेल्या उमेदवारास दिली जाईल.
12. सदर प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणास ७५ टक्के उपस्थिती आवश्यक (अनिवार्य) आहे परंतु प्रशिक्षणार्थी गंभीर आजारी पडणे, अपघात होणे, इतर स्पर्धा परीक्षांना उपस्थित राहणे (नैसर्गिक आपत्ती / कौटुंबिक समस्या / वैद्यकीय कारण) या कारणामुळे कोचिंग क्लासेस ला अनुपस्थित असल्यास अपवादात्मक परिस्थिती मध्ये प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन अदा करण्याबाबतचा अंतिम निर्णय मा. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचा असेल.
13. अनुसूचित जमातीच्या प्रशिक्षणार्थी व त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.८,००,०००/- (अक्षरात रुपये आठ लक्ष फक्त) या पेक्षा कमी असावी.
14. ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांची निवड झाल्यानंतर तात्काळ दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेत रुजू होणे बंधनकारक असेल व ७ दिवसाच्या आत रुजू करण्याचे हमीपत्र या कार्यालयास जमा करून जे उमेदवार दिलेल्या तारखेपासून १५ दिवसाच्या आत रुजू होत नाहीत, अशा उमेदवारांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करून त्यांना प्रशिक्षणासाठी दिल्ली येथे पाठविण्यात येईल. अपवाद महारष्ट्र लोकसेवा आयोग किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या मुलाखत किंवा इतर बाबी संदर्भात समस्या उद्भवल्यास त्याची कारण मिमांसा करून योग्य निर्णय घेण्याचा अधिकार मा. आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचा असेल.
15. सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थेने (Empanel) नामिका सूचीसाठी श्रीराम'स आय. ए. एस. नवी दिल्ली (Sriram's IAS, New Delhi) या संस्थेचा समावेश केला आहे. सदर संस्थेस सामान्य अध्ययन या विषयाची पूर्व मुख्य तसेच वैकल्पिक विषय तयारी, व्याख्यातांचे मानधन, स्टडी मटेरियल, नोट्स (वाचन साहित्य) टेस्ट सेरीज, मुलाखत व आवश्यक वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके, स्टेशनरी इ. पुरविणे तसेच प्रशिक्षणाच्या इतर अनुषंगिक खर्च यासाठी फी अदा करण्यात येईल.
प्रशिक्षणार्थीना देण्यात येणाऱ्या सोई सुविधा:-
- नवी दिल्ली येथील श्रीराम'स आय. ए. एस. या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेताना प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास दर महिन्यास रुपये १२,०००/- इतके विद्यावेतन देण्यात येईल.
• सदर विद्यावेतनासाठी प्रशिक्षणार्थीची हजेरी किमान ७५ टक्के असणे बंधनकारक आहे. सबंधित प्रशिक्षण संस्थेकडून प्रत्येक महिन्याचे उपस्थिती पत्रक प्राप्त झाल्यावरच प्रशिक्षणार्थीच्या बँक खाती विद्यावेतनाची रक्कम DBT द्वारे वर्ग करण्यात येईल. कोणत्याही प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षणास उपस्थित न राहता अथवा ७५ टक्के पेक्षा कमी हजेरी असल्यास विद्यावेतनासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेवर दबाव आणल्यास सदर प्रशिक्षणार्थीस अपात्र ठरवण्यात येईल.
• पुस्तक खरेदी करीता प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास एकदाच रुपये १४,०००/- देण्यात येईल.
• नवी दिल्ली येथील श्रीरामास आय. ए. एस. या प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षणाच्या सुरुवातीस जाण्याकरिता व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रु. २०००/- इतकी रक्कम प्रवास भत्ता व प्रवास खर्च म्हणून प्रशिक्षणार्थीच्या बँक खाती सदर रक्कम DBT द्वारे वर्ग करण्यात येईल.
• सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी नियमित स्वरूपाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
या योजने बाबत अधिक माहितीसाठी कृपया आदिवासी विकास विभाग यांचा शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण -२०२१/ प्र.क्र. ३४/ का. ०९ दिनांक: २० एप्रिल २०२१ वाचा. तसेच उमेदवारास आवेदन पत्र भरणे (Application Form) तसेच सबंधित इतर तांत्रिक अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी वेबसाईट वर देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांक व ईमेल आय. डी. वरच संपर्क साधावा:
* सूचना सदर योजनेसाठी https://trti.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरूनच ऑन लाईन स्वरुपातच अर्ज करावेत.
सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
१. अद्यावत फोटोग्राफ (Only JPG or JPEG Size between 80 100 KB)
२. अद्यावत स्वाक्षरी (Only JPG or JPEG Size between 3050 KB)
● खाली नमूद सर्व आवश्यक कागदपत्रे हि फक्त PDF फॉरमॅट मध्ये Size between 200-300 KB
मध्ये स्कॅन केलेली असावीत
१. अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
२. अनुसूचित जमातीचे वैधता मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
३. दहावी गुण पत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
४. बारावी गुण पत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
५. पदवी गुण पत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
६. डोमिसाईल मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
७. आधारकार्ड मूळ छायांकित स्कॅन प्रत
८. आधारकार्ड लिंक असलेले मूळ बँक तपशील- पास बुक स्कॅन प्रत
९. तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला मूळ उत्पन्नाचा दाखला स्कैन प्रत १०. सिविल सर्जन यांनी निर्गमित केलेला मूळ अपंगाचा दाखला स्कॅन प्रत
१९. उपायुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला मूळ अनाथाचा दाखला स्कॅन
वर नमूद सर्व कागदपत्रांसोबत सबंधित भरलेल्या मूळ अर्जाची प्रत, परीक्षा प्रवेश पत्र इ. बाबी डाऊनलोड करून ठेवावी. प्रवेश घेते वेळेस जर उमेदवारांनी उपरोक्त नमूद कागदपत्राची पूर्तता न केल्यास या योजनेचा लाभ देता येणार नाही. उपरोक्त नमूद सबंधित भरलेला अर्जाची मूळ प्रत, परीक्षा प्रवेश पत्र नमूद सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणी करण्याच्या अटी व शर्ती" च्या अधीन राहून गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल. मूळ अर्जासह सर्व कागदपत्राच्या छायांकित प्रती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, २८, राणीचा बाग, जुने सर्किट हाउस जवळ, पुणे ४११००१ या कार्यालयात जमा करावे लागेल यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
• प्रवेश परीक्षा, प्रवेश पत्र, गुणवत्ता यादी / प्रतीक्षा यादी, कागदपत्रे तपासणी / पडताळणी, तसेच इतर प्रक्रिया बाबतची सर्व अद्यावत माहिती www.trti.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात येईल. याबाबतची कोणतीही माहिती कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक स्वरुपात कळविण्यात येणार नाही.
सदर योजनेचा आढावा घेण्यासाठी व अंमलबजावणीत काही अडचणी आल्यास उचित बदल करून त्यास मान्यता देण्याचे अधिकार मा. आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांना असतील.
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात दिनांक :- ०१ /०९ / २०२२
ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी शेवटची तारीख :- २० /९/२०२२ पर्यंत अर्ज करता येईल
ऑनलाईन अर्ज करा :- इथे पहा ( लिंक लवकरच उपलब्ध होईल )
योजनेची सविस्तर माहिती :-इथे पहा
शासन निर्णय :- इथे पहा
0 टिप्पण्या