ads

Film 'The Kashmir Files-Vivek Agnihotri-कोण आहे विवेक अग्निहोत्री?

Film 'The Kashmir Files:(Vivek Agnihotri)-कोण आहे विवेक अग्निहोत्री?

Film 'The Kashmir Files: विवेक अग्निहोत्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. खरे तर विवेक अग्निहोत्री हा चित्रपट दिग्दर्शक आहे. आणि नुकताच त्याचा ' काश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने चांगली कामगिरी करत अनेक विक्रम केले. यांच्या विषयी आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. 

https://www.marathionlineupdate.com/
Vivek Agnihotri


कश्मीर फाइल्स (The Kashmir Files)

हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 15 कोटींच्या बजेटमध्ये बनला असून या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात जवळपास 100 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती या कलाकारांनी चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट काश्मीर खोऱ्यात १९९० च्या दशकात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित आहे.

काश्मिरी पंडितांची हत्या :-

1990 मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडामुळे काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे पलायन झाले. अहवालानुसार, 140,000 काश्मिरी पंडितांपैकी सुमारे एक लाख लोक काश्मीर खोऱ्यातून स्थलांतरित झाले होते. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 1988 ते 1991 दरम्यान 218 काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. या काळात काश्मिरी पंडित महिलांचेही लैंगिक शोषण झाले.

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri):-

विवेक अग्निहोत्री हा चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. 2005 मध्ये 'चॉकलेट' या चित्रपटातून त्याने करिअरला सुरुवात केली. याशिवाय त्याने धन धना धन गोल, हेट स्टोरी, जिद्द, बुद्ध इन ए ट्रॅफिक जॅम, जुनूनियत, द ताश्कंद फाइल्स आणि द काश्मीर फाइल्स या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

उल्लेखनीय आहे की, विवेक अग्निहोत्री यांना ताश्कंद फाइल्ससाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हे पण वाचा:-Bhagwant Mann-चर्चित व्यक्ती : भगवंत मान यांच्याविषयी -Who is Bhagwat man?

हे पण वाचा:-कर्नाटकचे दिशांक अॅप-Karnataka’s Dishaank app


 सूचना :- वाचकहो जर आपल्या जवळ " Vivek Agnihotri-कोण आहे विवेक अग्निहोत्री?आणखीन Information असेल किंवा दिलेल्या माहितीत काही चुकीचे आढळल्यास त्वरीत लिहुन कळवा किंवा कमेंट मधे लिहा आम्ही त्याला  अपडेट करू. 

आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads