क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना २०२२ फक्त मुलींसाठी
Krantijyoti Savitribai Phule Arth Sahay Yojana २०२२ ;-आज आपण या लेखात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2022 हि योजनात सविस्तर आहोत तर पाह अनेक वेळा शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहत असतात ते राहू नये म्हणून विद्यापीठाकडून सदर अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2022 योजनेअंतर्गत सोबत जोडलेल्या नियम व अटीनुसार अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त १० व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त ५ विद्यार्थीनीस गुणानुक्रमे रू. ५००० अर्थसहाय्य देण्यात येईल.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुणे विद्यापीठाने महाविद्यालये/विद्यापीठ विभागामध्ये अव्यवसायिक अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींसाठी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना’ हि योजना सुरू केलेली आहे.
Krantijyoti Savitribai Phule Arth Sahay Yojana
या योजनेसंबंधित अटी शर्ती ह्या खाली दिलेल्या आहेत.
टीप:- हि योजना फक्त मुलींसाठी आहे.
१) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2022 या योजनेसाठी महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त १० व अव्यवसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त ०५ विद्यार्थीनी सदर योजनेसाठी पात्र राहतील.
२) या योजनेच्या पात्र विद्यार्थीनीस रू ५००० अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
३) विद्यार्थीनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा पेक्षा जास्त नसावे यासाठी संबंधित तहसिलदाराचा दाखला आवश्यक राहील.या योजनेचे अर्थसहाय्य पात्र विद्यार्थिनीस संपूर्ण पदवी आणि पदव्युत्तर काळात एकाच वेळी देण्यात येणार आहे.
४) विद्यार्थिनीने मागील लगतच्या परीक्षेत किमान पन्नास टक्के गुण संपादित केलेले असावेत. पन्नास टक्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थीनींचा गुणांनुक्रमे विचार करण्यात येईल.
५) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2022 योजनेचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थीनीने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
६) विद्यार्थीनीने व्यवसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला नसावा.
७) विद्यार्थीनीची नियमित अभ्यासक्रमात किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील. या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील,
८) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2022 विद्यार्थीनीस या योजनेच्या कालावधीत कोणतीही नोकरी स्विकारता येणार नाही.
९) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2022 योजनेसाठी विद्यार्थीनीस गैरशिस्त / नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
१०) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2022 अर्थसहाय्यासाठी विद्यार्थीनीच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर इतर उपक्रमातील सहभाग उदा. क्रीडा, समाजसेवा, कला इ. विचारात घेण्यात येईल.
११) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2022 विद्यार्थीनीने त्यांच्या बँक खात्याची पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ :- पूर्ण बँकेचे नाव, पूर्ण पत्ता, पूर्ण खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड इत्यादी )
Krantijyoti Savitribai Phule Arth Sahay Yojana
१२) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2022 अर्थसहाय्य योजनेसाठी विद्यार्थ्यानींची निवड करण्यासाठी महाविद्यालय पातळीवर मा. प्राचार्याच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठीत करून अर्जाची छाननी करावी.
१)मा. प्राचार्य (अध्यक्ष)
२)महाविद्यालयातील समन्वयक, विद्यार्थी कल्याण योजना
३) महाविद्यालयातील विविध शाखांच्या तीन प्राध्यापिका
१३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना या योजनेचं लाभ घेण्यासाठी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्याथ्यांनीस सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही . तस याबाबत संबंधित विद्यार्थीनीने आणि प्राचार्यांनी तसे हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील.
Krantijyoti Savitribai Phule Arth Sahay Yojana 2022 |
0 टिप्पण्या