ads

Gadge maharaj information in marathi-संत गाडगे महाराज

                        संत गाडगे महाराज

Gadge maharaj information in marathi-
Gadge maharaj information in marathi


Gadge maharaj information in marathi-संत गाडगे महाराज

गाडगे महाराज, संत गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत. ते संत आणि समाजसुधारक होते. महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक म्हणून ओळख.  

Gadge maharaj information in marathi

त्यांनी अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यांची दूरदृष्टी आणि गावांचा विकास आजही देशभरातील अनेक सेवाभावी संस्था, राज्यकर्ते आणि राजकारण्यांना आजही  प्रेरणा देत आहे. त्यांच्या नावाने महाविद्यालये, शाळांसह अनेक संस्था सुरू करण्यात आल्या आहेत.  

भारत त्यांच्या नावाने सरकारने स्वच्छता आणि पाणी या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा केली.त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठाचे नावही ठेवण्यात आले आहे. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने 'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान' सुरू केले .

माहिती:-Gadge maharaj information in marathi

नाव :-               संत गाडगे महाराज आणि गाडगे बाबा

खरे नाव :- डेबूजी झिंगराजी जानोरकर

वडिलांचे नाव :- झिंगारजी जानोरकर

आईचे नाव :- सखुबाई

जन्मतारीख :- 23 फेब्रुवारी 1876

जन्मस्थान :- शेंडगाव, महाराष्ट्र

मृत्यू तारीख :- 20 डिसेंबर 1956

मृत्यू स्थळ:- अमरावती

गाडगे महाराज थोडक्यात माहिती:-Gadge maharaj information

त्यांचे खरे नाव  डेबूजी झिंगराजी जानोरकर. गाडगे बाबांचा  जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेडगाव गावात  झाला. ते मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरी येथे आपल्या आजोबांच्या घरी लहानाचा मोठे  झाले . लहानपणीच त्यांना शेतीमध्ये   रस होता. त्यांनी १८९२ मध्ये लग्न केले आणि त्यांना नंतर  तीन मुले झाली.

 त्यांच्या  मुलीच्या नामकरण समारंभात, तिने पारंपारिक मद्याऐवजी गोडथोड व  शुद्ध शाकाहारी जेवण दिले होते .दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला होताते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. त्यांचा नेहमी अंगावर गोधडी फाटके-तुटके कपडे व  हातात एक फुटके गाडगे किंवा मडके असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू असे लागले.


गाडगे महाराज हे आदिवासी , गोरगरीब, दीनदलित इत्यादी समाजातील यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे महाराष्ट्रातील  मोठे समाजसुधारक होते. ते आपल्या कीर्तनातून नेहमी म्हणत तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी  असे सांगत असत.   

दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे  त्यांचे नाव गाडगेबाबा होय . ते नेहमी सांगायचे  देवळात जाऊ नये  ,मूर्तिपूजा करू नये , ,सावकाराचे कर्ज काढू नये , ,अडाणी राहू नये , पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये ." अशी शिकवण व संदेश  आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली आणि देत राहिले.

लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली आहेत. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.

त्यांच्या डोक्यावर झिंज्या, आणि वरून डोक्यावर  खापराच्या तुकड्याची टोपी, व एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश राहायचा . जेव्हा जेव्हा ते गावात पोहोचायचे तेव्हा  तेव्हा ते गावातील नाले आणि रस्ते स्वच्छ करायचे आणि गावकऱ्यांनी पैसे दिले तर ते समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी वापरले. 

गाडगे बाबानी लोकांना साधे जीवन जगावेआणि  धार्मिक कारणांसाठी होणारी जनावरांची कत्तल थांबवावी तसेच  दारूबंदीविरोधात मोहीम राबवावी, असे आवाहन केले होते . गाडगे बाबानी कठोर परिश्रम, साधे जीवन आणि गरिबांची नि:स्वार्थ सेवा करण्याचा उपदेश केला. 

त्यांनी धार्मिक स्थळे आणि अनाथ आणि अपंगांसाठी धार्मिक शाळाही स्थापन केल्या आहेत . अशा महान मानवाचा लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी निधन झाले. या महान ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. 


संत गाडगे बाबा हे खरे निस्वार्थी कर्मयोगी होते. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक धर्मशाळा, गोशाळा, शाळा, रुग्णालये आणि वसतिगृहे बांधली आहेत . भिक मागून त्यांना हे सगळं मिळालं, पण या महामानवाने त्यांच्या संपूर्ण आयुष्यात स्वत:साठी झोपडीही बांधली नाही."Gadge maharaj information in marathi"


"संत गाडगेबाबांचा दशसूत्री  महत्वाचा संदेश "

गाडगेबाबा प्रबोधन काव्य :- ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’

भुकेलेल्यांना : अन्न

तहानलेल्यांना :पाणी

उघड्यानागड्यांना:वस्त्र

गरीब मुलामुलींना :शिक्षणासाठी मदत

बेघरांना :आसरा

अंध, पंगू रोगी यांना:औषधोपचार

बेकारांना:    रोजगार

पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना:    अभय

गरीब तरुण-तरुणींचे : लग्न

दुःखी व निराशांना : हिंमत

गोरगरिबांना :शिक्षण

हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!  असे ते नेहमी सांगायचे. 


सूचना :- वाचकहो जर आपल्या जवळ Gadge maharaj information in marathi"आणखीन Information असेल किंवा दिलेल्या माहितीत काही चुकीचे आढळल्यास त्वरीत लिहुन कळवा किंवा कमेंट मधे लिहा आम्ही त्याल अपडेट करू. 

आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads