महात्मा जोतीराव फुले शिष्यवृत्ती योजना | Mahatma Jyotiba Phule Scholarship Yojana 2022
Mahatma Jyotiba Phule Scholarship Yojana 2022 |
Mahatma Jyotiba Phule Scholarship Yojana:- आज आपण या लेखात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची महात्मा जोतीराव फुले शिष्यवृत्ती योजना याची माहिती घेणार आहोत. तर पहा हि योजना गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठामार्फत सदर शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. हि योजना पदवी आणि पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हि योजना लागू करण्यात आली आहे .
अर्ज (सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील एकत्रित सर्व ) हे गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील. आणि तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहणार आहे.
पदवी अभ्यासक्रम :- शिष्यवृत्ती हि कला व वाणिज्य शाखेसाठी ६००० हजार आणि विद्यार्थीं संख्या ४७० राहणार आहे. तसेच विज्ञान शाखेसाठी १०००० हजार आणि विद्यर्थी संख्या हि ४७० राहील.
पदव्यूत्तर अभ्यासक्रम :- शिष्यवृत्ती हि कला व वाणिज्य शाखेसाठी ८००० हजार आणि विद्यार्थीं संख्या ३०० राहणार आहे. तसेच विज्ञान शाखेसाठी १६००० हजार आणि विद्यर्थी संख्या हि ४७० राहील.
Mahatma Jyotiba Phule Scholarship Yojana
पात्रतेचे निकष व अटी ह्या खाली दिलेल्या आहेत.
०१) महात्मा जोतीराव फुले शिष्यवृत्ती योजना अव्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्याध्यांसाठी लागू केलेली असून योजनेसाठी उत्पन्नाची कोणतेही अट राहणार नाही केवळ गुणवत्ता हाच निकष राहणार आहे.
०२) महात्मा जोतीराव फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने मागील लगतच्या परीक्षेत किमान ७० टक्के गुण संपादित केलेले असावेत.
०३) महात्मा जोतीराव फुले शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे वय पदवी अभ्यासक्रमाकरिता २३ व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता २५ पेक्षा जास्त असू नये .
०४) महात्मा जोतीराव फुले शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे . या संदर्भात तुमच्या प्राचार्यानी दाखला देणे आवश्यक राहील.
०५) महात्मा जोतीराव फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी कॉलेज / विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्याने नियमित प्रवेश घेतलेला असावा.
०६) महात्मा जोतीराव फुले शिष्यवृत्ती या योजनेसाठी विद्यार्थ्यांने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेतलेलेअसू नये .
०७) महात्मा जोतीराव फुले शिष्यवृत्ती योजेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यास गैरशिस्त/नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. याबाबत शिक्षा झालेली नसावी.
८) विद्यार्थ्याने त्याच्या बँक खात्याची पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. पूर्ण बँकेचे नाव, पूर्ण पत्ता, पूर्ण खाते क्रमांक (MICR कोड आणि IFSC कोड इ.)
०९) विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा. व सोबत नागरिकत्वाचा साक्षांकित दाखला जोडणे आवश्यक राहील.
१०) योजनेसाठी त्या संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त किंवा प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यताप्राप्त असावेत.
११) महात्मा जोतीराव फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू असणार नाही. याबाबत संबंधित त्या विद्यार्थ्याने आणि प्राचार्यानी ऐकत्र हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे.
Mahatma Jyotiba Phule Scholarship Yojana 2022 |
हे पण वाचा :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2022
0 टिप्पण्या