ads

स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना 2022 | Swami Vivekananda Student Yojana 2022

 स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना ( पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यासाठी | Swami Vivekananda Student Yojana 2022

https://www.marathionlineupdate.com/
Swami Vivekananda Student Yojana 2022


Swami Vivekananda Student Yojana:-मित्रानो आज आपण या लेखात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची  स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना  हि या लेखात पाहणार आहोत.  तर पहा  (पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यासाठी हि योजना लागू आहे ) अनेक विद्यार्थ्यांना कोणत्या न कोणत्या कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असते . अशावेळी  अनेक  विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत असतात . याचा विचार करून  विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासुन नव्याने सदर हि योजना सुरू करण्यात आलेली आहे.

 स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजनेचा लाभ सरसकट पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या एकुण ३२,००० हजार विद्यार्थ्यास गुणवत्तेनुसार रू.१०००/- अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोणत्या न कोणत्या कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असते.


अशावेळी अनेक  विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत असतात. पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासुन नव्याने सदर हि योजना सुरू करण्यात आ ली  आहे.


Swami Vivekananda Student Yojana

या योजनेच्या पात्रतेच्या नियम व अटी  ह्या खाली देण्यात आलेल्या आहेत. 


१)    सदर योजना व्यवसायिक व अव्यवसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार लागू राहणार आहे.


०२)    पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या चारही विद्याशाखेतील प्रत्येकी ८,००० हजार  विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार एक हजार प्रमाणे एकुण ३२००० हजार विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल.


०३)    महाविद्यालय व विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्याने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा. 

०४) महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील. या संदर्भात तसा  प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील.

०५) पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थी म्हणून मा.प्राचार्य/विद्यापीठ विभागप्रमुख यांनी शिफारस करणे आवश्यक राहील.


०६)    तसेच या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यास या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्विकारता येणार नाही. 

०७)   या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यास गैरशिस्त , नैतिकता,परीक्षेतील गैरप्रकार इत्यादी बाबत शिक्षा झालेली नसावी.


०८)    विद्यार्थ्याने त्यांच्या बँक खात्याची सपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)


०९)    विद्यार्थ्याने आणि संबंधित प्राचार्यांनी एकत्रित हमी पत्र भरून देणे आवश्यक राहील.


अधिक माहितीसाठी खालील लिंक चा वापर करावा


अर्ज पहा :इथे क्लिक करा 

website :-click

https://www.marathionlineupdate.com/
Swami Vivekananda Student Yojana 2022


 हे पण वाचा :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2022

हे पण वाचा :- महात्मा जोतीराव फुले शिष्यवृत्ती योजना 

आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads