ads

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2022 | Shahu Maharaj Shishyavrutti Yojana 2022

 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2022 | Shahu Maharaj Shishyavrutti Yojana 2022

https://www.marathionlineupdate.com/
Shahu Maharaj Shishyavrutti Yojana 



Shahu Maharaj Shishyavrutti Yojana 2022:- आज आपण या लेखात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सविस्तर बघणार आहोत. तर पहा हि योजना मागासवर्गीय घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यासाठी विद्यापीठामार्फत सदर शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केलेली आहे. तसेच सदर योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू असून पदवी व पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज (राज्यातील सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील एकत्रित) गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील.

या योजनेत त्यापैकी 48% मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा एकत्रित गुणवत्तेनुसार व उर्वरित 52% विद्यार्थ्याचा त्या त्या प्रवर्गासाठी लागू असलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार गुणानुक्रमे अर्ज विचारात घेतले जातील. हि योजना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहील.


Shahu Maharaj Shishyavrutti Yojana

हि सदरची योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू राहील.य योजनेसाठी उत्पन्नाची कोणतेही अट राहणार नाही केवळ गुणवत्ता हाच निकष राहणार आहे.

तसेच मागील वर्षीच्या त्या परिक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी किमान ६० % गुण संपादित केलेले असावेत. या पात्र विद्यार्थ्यांचे वय पदवी अभ्यासक्रमाकरीता २५ वर्ष  व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता ३० वर्ष  पेक्षा जास्त नसावे.

पात्रतेचे निकष खालील प्रमाणे राहतील. 

१) या योजनेचा लाभ घेणेसाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहणार आहे .

२) महाविद्यलात त्या विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान ७५ % उपस्थिती असणे आवश्यक राहील. या संदर्भात प्राचार्यानी दाखला देणे आवश्यक राहील म्हणजेच ७५ टक्के उपस्थिती दाखला असावा. 

३) योजनेचा ला घेण्यासाठी महाविद्यालय/ विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्याने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.

४)  त्याने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा.

५)त्या विद्यार्थ्यास गैरशिस्त/नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.

६) त्याने त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे स पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, अचूक खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)

७) तो विद्यार्थी भारतीय नागरिक असावा. त्यासाठी नागरिकत्वाचा साक्षांकित दाखला जोडणे आवश्यक राहील म्हणजेच डोमासईल जोडणे. 

८) त्या संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त तसेच किंवा प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यताप्राप्त असावेत.

९) आणि जे विद्यार्थी  शासनाच्या इतर  शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना हि  योजना लागू राहणार नाही. तसे संबंधित विद्यार्थ्याने आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील.

अर्ज पहा :- इथे क्लिक करा 

website :-click

https://www.marathionlineupdate.com/
 Shahu Maharaj Shishyavrutti Yojana 2022


आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi onlie update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads